Shahi mushroom recipe in marathi

बोटे चाटायला लावणारी शाही मशरूम रेसिपी

शाही मशरूम रेसिपी मराठीमध्ये

ingredients

200 gm मशरूम

4 कांदे

7__8 टोमॅटो

आलं थोडसं

हिरवी मिरची

1/2 चमचे लाल मिरची पावडर

1/2 चमचा गरम मसाला

1 चमचा साखर

1/2 वाटी काजूची पेस्ट

एक कप मलई

मीठ चवीनुसार

3 चमचे तूप

बारीक चिरलेली कोथिंबीर

shahi mushroom recipe in marathi

Method

सगळ्यात पहिल्यांदा मशरूमला दोन तुकड्यांमध्ये चिरून घेणे. कांदा सुद्धा बारीक चिरून घेणे. टोमॅटो आलं आणि हिरवी मिरची सुद्धा चिरून घेणे.‌

गॅस चालू करून त्यावर एक पॅन ठेवणे. त्यामध्ये तूप गरम करणे. जेव्हा तेल गरम होईल त्यावेळी त्यात चिरलेला कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घेणे.

नंतर त्यामध्ये टोमॅटो , आलं आणि हिरवी मिरची चिरलेली घालणे. जेव्हा टोमॅटो चांगल्या प्रकारे भाजेल त्यावेळी गॅस वरून ते मिश्रण खाली उतरवून थोडे थंड होऊ द्या .

त्यानंतर त्या मिश्रणला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेणे . नंतर गॅस चालू करून त्यावर एक पॅन ठेवणे.

पॅनमध्ये ते मिश्रण घालून त्यात मीठ, लाल मिरची , गरम मसाला, साखर क्रीम आणि काजूची पेस्ट सुद्धा घालणे, दोन ते तीन मिनिट मशरूम घालून शिजवणे .

बारीक गॅसवर पाच मिनिट शिजण्यासाठी ठेवणे. गॅसवरून खाली उतरवून घ्या.त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवणे.

गरम गरम शाही मशरूम नान पराठा किंवा भातासोबत सर्व करू शकता. तुमचा शाही मशरूम तयार आहे.

shahi mushroom recipe in marathi – enjoy 😊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *