Bread roll recipe in Marathi

Bread roll recipe in Marathi

ब्रेड रोल कसा बनवावा

ingrediant

5__6 बटाटे

12 ब्रेड

एक चमचा धने पावडर

अर्धा चमचा गरम मसाला

अर्धा चमचा आमचूर पावडर

हिरवी मिरची दोन बारीक चिरलेली

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

आलं एक तुकडा

लाल मिरची छोटा चमचा

मीठ चवीनुसार

तेल तळण्यासाठी

chocolate chips cookies recipe in Marathi.

bread roll recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा बटाटे पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्याला गॅस चालू करून एका कुकरमध्ये भरून गॅसवर उकळी येण्यासाठी ठेवणे.

उकळलेल्या बटाट्याला थंड होण्या साठी बाजूला ठेवणे. थंड झाल्यानंतर बटाटे सोलून बारीक तोडून घेणे .

गॅस चालू करून त्यावर एक कढईत ठेवणे. कढाईत एक मोठा चमचा तेल घालणे आणि गरम करून घेणे.

तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि धने पावडर घालून भाजून घेणे.

मसाला भाजून झाल्यानंतर त्यात तोडलेले बटाटे घालणे. त्यानंतर आमचूर पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मसाले मिक्स करून घेणे. रोल बनवण्यासाठी मसाले तयार आहे .

नंतर गॅस बंद करून मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे. मसाला थंड झाल्यानंतर प्रत्येक मसाल्याचा गोळा घेऊन लाटण्याचे साह्याने त्याला प्लेटवर ठेवून थोडंसं लाटून घेणे .

ब्रेड घेऊन ब्रेडच्या किनाऱ्याला चाकूच्या साह्याने कट करून वेगळे करणे. सगळे ब्रेड याच प्रकारे तयार करून घेणे.

एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये एक एक ब्रेड पाण्यामध्ये भिजवून काढून घेणे.

पाण्यात भिजवलेल्या ब्रेडला हातावर ठेवून एका हाताने दुसऱ्या हातावर दाबून घेणे.

ब्रेड मधला सगळा पाणी काढून घेणे
. Heat stroke in marathi.

आता त्यावर तयार करून ठेवलेला बटाटे मसाला ठेवून चारी बाजूने रोलला बंद करून घेणे.

अशा प्रकारे सगळे बटाटे रोल एक एक ब्रेड मध्ये घालून तयार करून प्लेटमध्ये लावून ठेवणे .

गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवणे . कढईमध्ये तेल घालून गरम करणे .

तयार केलेले रोल दोन ते तीन त्या गरम तेलात घालून चिमट्याच्या साह्याने आलटून पलटून ब्राऊन होईपर्यंत तळून घेणे .

तळलेले ब्रेड रोल काढून एका प्लेटमध्ये बाजूला ठेवणे. अशाप्रकारे तुमचे सारे रोल तयार करून घेणे .

गरम गरम ब्रेड रोल हिरव्या चटणी सोबत किंवा गोड चटणी सोबत खाऊ शकता . तुमचा ब्रेड रोल तयार

आहे.

bread roll recipe in Marathi and ब्रेड रोल बनवण्याची पद्धत मराठीमध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *