Gulab jamun recipe in Marathi
गुलाब जामुन बनवण्याची पद्धत
ingrediant
खवा 250 gm
पनीर 100 gm
मैदा 20__30 gm
काजू एक चमचा बारीक चिरलेला
मनुके एक चमचे
साखर 600 gm
तूप तळण्यासाठी
anjeer kofta curry recipe in Marathi.
gulab jamun recipe in Marathi
METHOD
पहिल्यांदा एक भांडे घेऊन त्यात मावा पनीर आणि मैदा ठेवून घेणे. याला तो पर्यंत मसाज mix करणे की जोपर्यंत पीठ नरम आणि चिकट पिठासारखे होत नाही .
अशाप्रकारे गुलाब जामुन बनवण्यासाठी तुमचा मावा तयार आहे .
पाक बनवण्यासाठी चा प्रयोग
एका भांड्यामध्ये साखर घालून त्यात तीनशे ग्रॅम पाणी मिक्स करून गॅस चालू करून घेणे.
ते पातेलं गॅसवर ठेवणे. त्यानंतर पाक ला उकळी आल्यानंतर साखर पाण्यात मिक्स झाल्यानंतर अजून शिजवून घेणे.
त्यातला एक दोन थेंब एका प्लेटवर काढून बोटाच्या साह्याने चिकटत आहे का ते पाहणे. जर चिकटत असेल तर तुमचा पाक तयार आहे . गॅस बंद करणे .
तयार खव्याने थोडासा खवा बाजूला घेऊन आपल्या बोटाच्या सहाय्याने हातावर चपटा करून त्यामध्ये तीन ते चार काजूचे तुकडे आणि मनुके भरून घेणे.
त्याला वरून खवा लावून चारी बाजूने बंद करून घेणे. आपल्या हाताच्या मध्ये ठेवून गोल करून घेणे . खवा गोळा अशा प्रकारे सगळे तयार करून घेणे .
आता गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवणे. त्या कढईत तूप घालून गरम करून घेणे.
तूप गरम झाल्यानंतर गुलाब जामुन बनवलेले खव्याचे गोळे तीन ते चार त्या तुपात सोडणे.
तूपात जर तुमचा खवा फाटत असेल तर त्याला वरून मैदा थोडासा मिक्स करणे . त्याने तुमचा खवा फाटणार नाही .
तीन ते चार गोळे कढाई मध्ये घालून गॅस बारीक करून गुलाब ला गरम गरम तुपात ब्राऊन होईपर्यंत सारखं हलवत चारी बाजूने तळून घेणे.
तळलेले गुलाब जामुन कढाई मधून बाहेर एका प्लेटमध्ये ठेवणे . थोडासा थंड झाल्यानंतर तयार केलेल्या पाकमध्ये सगळे खव्याचे गोळे ज्याचे गुलाब जामुन बनवले आहेत ते पाक मध्ये सोडून बाजूला काढणे .
या प्रकारे तुमचे गरम गरम गुलाब जामुन तयार आहे . Omee capsule in marathi.
gulab jamun recipe in Marathi and गुलाब जामुन कसे बनवावे मराठी मध्ये.