Anjeer kofta curry recipe in Marathi

Anjeer kofta curry recipe in Marathi

अंजीर कोफ्ता करी कशी बनवावी

ingrediant

उकडलेले बटाटे दोन

पनीर शंभर ग्राम

अंजीर चार पाण्यामध्ये भिजवलेले

कॉर्नफ्लॉवर दोन चमचे

मीठ चवीनुसार

काळी मिरी पावडर अर्धा चमचा

तेल तळण्यासाठी आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी

ग्रेव्ही बनवण्याची सामग्री

टमाटे दीडशे ग्रॅम

हिरवी मिरची दोन

काजू वीस पंचवीस

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

आल पेस्ट एक चमचा

लसूण पेस्ट एक चमचा

हळदी पावडर अर्धा चमचा

जीरा एक चमचा

लाल मिरची पावडर एक चमचा

गरम मसाला अर्धा चमचा

धने पावडर एक चमचा

मीठ चवीनुसार

veg manchow soup recipe in Marathi.

anjeer kofta curry recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा बटाटे कुकरमध्ये घालून गॅसवर उकडून घेणे .‌‌

उकडलेल्या बटाट्यांना सोलून एका वाटीमध्ये बटाटे आणि पनीर ला बारीक करून त्यामध्ये मीठ , काळीमिरी आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि कॉर्नफ्लोर घालून सगळे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे.

त्याला पिठासारखा मळून चांगलं मसाज करून चिकट बनवून तयार करून घेणे . अंजीरला लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घेणे .

एका पिठाचा गोळा तोडून त्याला हातावर ठेवून बोटाच्या साह्याने मोठे करून त्यामध्ये अंजीर चे तीन ते चार तुकडे त्या गोळ्यावर ठेवणे.

हे चारी बाजूने स्टफिंग ला बंद करून गोळ्याला हाताने चांगल्या प्रकारे गोल करून प्लेटमध्ये ठेवणे . अशाप्रकारे सगळे कोफ्ते भरून तयार करून घेणे .

गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणे .

तेल गरम झाल्यानंतर चार ते पाच कोफ्ते गरम तेलामध्ये घालून आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणे .

तळल्यानंतर प्लेटमध्ये काढून ठेवणे . सारे कोफ्ते याच प्रकारे तळून घेणे . बाजूला एका प्लेटमध्ये ठेवणे .

कोफ्ते बनवण्यासाठी ग्रेव्ही ____

टोमॅटो, हिरवी , मिरची आणि काजू ला मिक्सर मध्ये बारीक पिसून घेणे.

कढाई मध्ये राहिलेलं तेल काढून फक्त दोन चमचे तेल ठेवून गरम तेलामध्ये जिरा घालने .

जिरा भाजल्यानंतर हळदी पावडर , त्यानंतर धनिया पावडर घालून मसाला थोडासा भाजून घेणे.

आता त्यामध्ये आलं पेस्ट आणि टोमॅटो , काजू , हिरवी मिरचीची पेस्ट घालून मसाले तोपर्यंत हलवत राहणे जोपर्यंत मसाल्याला तेल येत नाही .

त्यानंतर मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर घालून आणि मधे मधे हलवत राहणे . मसाले चांगले भाजून घेणे .

मसाल्या वरती तेल वेगळे झाल्यानंतर मसाला भाजून तयार आहे . त्यामध्ये एक कप पाणी घालून मीठ , गरम मसाला आणि कापलेली कोथिंबीर मिक्स करून घेणे.

अजून एकदा एक उकळी येईपर्यंत गॅस वरती ग्रेव्ही शिजवण्यासाठी ठेवणे . त्यानंतर गॅस बंद करून झाकण घालून तीन ते चार मिनिट तसंच शिजवण्यासाठी ठेवणे .

अशाप्रकारे तुमची ग्रेव्ही बनवून तयार आहे . गॅस बंद करणे आणि ग्रेव्हीला एका वाटीमध्ये काढून कोफ्ते घालून घेणे.

त्यावर हिरवी कोथिंबीर घालून अंजीर कोफ्ता करी तुमची बनवून तयार आहे. याला तुम्ही चपाती, पराठे , नान, पुरी कशाही सोबत खाऊ शकता .

Anjeer kofta curry recipe in Marathi and अंजीर कोफ्ता करी बनवण्याची पद्धत मराठीमध्ये. Fungus infection in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *