Hyderabadi dum biryani recipe in marathi

Hyderabadi dum biryani recipe in marathi

हैदराबादी दम बिर्याणी रेसिपी

ingrediants –

एक किलो चिकन

दोन मोठे कांदे

एक वाटी हिरवी कोथिंबीर

एक चमचा केसर

अर्धा कप उकडलेला दूध

मीठ चवीनुसार

दोन चमचे तूप

पाच चमचे तेल

बिर्याणी मसाला

5-5 लवंग

2-3 दालचिनी चे तुकडे

3-4 इलायची आणि

2-3 काळी मिरीी

2 -3 तमालपत्री

दोन कप बासमती तांदूळ

बॉइल करून दालचिनी लवंग तमालपत्री पुदिना आणि मिठ फ्राय केलेले

मॅरीनेट करण्यासाठी

तीन चार कप दही

आठ-दहा हिरवी मिरची मधून कापलेली

दीड चमचा आद्रक लसुन ची पेस्ट

एक चमचा लाल मिरची पावडर

एक चमचा हळदी पावडर

दोन ते तीन चम्मच गरम मसाला

अर्धी वाटी कापलेली कोथिंबीर

मीठ चवीनुसार

kavil chi lakshane Ani upchar

hyderabadi dum biryani recipe in marathi.

method –

बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले चिकन चांगले मॅरिनेट होणे खूप गरजेचे आहे , कारण त्यामुळे आपल्या बिर्याणीला टेस्ट एक नंबर येते .

चिकन मॅरीनेट करण्यासाठी एका बाऊल मध्ये चिकन चे तुकडे घ्या, त्यामध्ये सगळ्यात पहिले मीठ , हळदी , गरम मसाला, बिर्याणी मसाला, दही ,कसुरी मेथी , चिरलेली बारीक कोथिंबीर, लिंबू , मिरची पावडर हे सगळं लावून चिकन मॅरीनेट करण्यासाठी झाकून ठेवणे.

बिर्याणी बनवण्यासाठी चिकनला चार ते पाच तासासाठी मसाला लावून मॅरिनेट करायला ठेवणे. नंतर ते बाजूला ठेवून तेवढ्याच वेळेत गॅस चालू करून, एक pan गॅस वर ठेवून एक चमचा चमचा तेल घालून गरम करायला ठेवणे .

नंतर त्यामध्ये कापलेला कांदा फ्राय होण्यासाठी ठेवणे. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये बाकीचे मसाले म्हणजेच आले लसणाची पेस्ट , गरम मसाला , बिर्याणी मसाला हे सगळे घालून चांगले फ्राय करणे.

एका वाटीमध्ये दूध आणि केसर मधे भिजवून ठेवणे. एक कुकर घेऊन त्यामध्ये आतून तेल लावून घेणे व तेल फ्राय करण्यासाठी टाकने.

मॅरीनेट केलेले चिकन फ्राय करून घेणे . त्यानंतर कुकरमध्ये एक भाताचा थर घालने आणि तूप घालून ठेवणे. नंतर भाजलेल्या कांदा, कापलेली कोथिंबीर आणि फ्राय केलेले बाकीचे मसाले पसरवून घ्यावेत, नंतर केसर युक्त दूध घालून झाकण लावून ठेवणे . 25 ते 30 मिनट शिजवण्यासाठी ठेवणे.

हो आता आपली हैदराबादी बिर्याणी तयार आहे. एका प्लेटमध्ये बिर्याणी काढून त्यावर फ्राय केलेला कांदा थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर टाकून सर्व करा.

read more – veg pulav recipe marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *