Mix veg soup recipe in Marathi
मिक्स व्हेज सूप कसा बनवावा
ingrediant
एक गाजर बारीक कापलेला
कोबी बारीक कापलेली
हिरव्या वाटाण्याचे दाणे अर्धी वाटी
एक ढब्बू मिरची बारीक कापलेली
आलं पेस्ट एक चमचा
कॉर्नफ्लॉवर एक मोठा चमचा
लोणी दोन मोठे चमचे
काली मिरची अर्धा छोटा चमचा
पांढरी मिरची अर्धा चमचा
चिली सॉस एक मोठा चमचा
मीठ चवीनुसार
अर्धा लिंबू
हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली
mix veg soup recipe in Marathi
METHOD
पहिल्यांदा सगळ्या भाज्यांना धुवून आणि बारीक बारीक चिरून घेणे .
नंतर कॉर्नफ्लोर दोन मोठे चमचे पाण्यामध्ये घालून त्याचं मिश्रण बनवून घेणे. मिश्रण बनवताना गाठी होऊ न देणे .
एका जाड भांड्यामध्ये लोणी घालून गॅसवर गरम करून घेणे. गरम झाल्यानंतर आलं ची पेस्ट, नंतर सगळी बारीक चिरलेली भाजी घालून गरम करून घेणे .
भाज्यांना लोणी मध्ये दोन मिनिटांसाठी बारीक गॅसवर भाजून घेणे. नंतर भाजीवर झाकण घालून दोन मिनिटांसाठी बारीक गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणे.
भाजीमध्येे पाणी घालून कॉर्नफ्लोर चे मिश्रण मिक्स करून घेणे . नंतर काळी मिरी , पांढरी मिरी , चिल्ली सॉस आणि मीठ घालून सुप ला उकळी आल्यानंतर सारखं हलवत राहणे .
उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनिटासाठी बारीक गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणे . नंतर गॅस बंद करणे
सूप मध्ये लिंबाचा रस आणि हिरवी कोथिंबीर वरून थोडा लोणी घालून मिक्स करणे .
तुमचा मिक्स व्हेजिटेबल सूप तयार आहे . गरमागरम खाण्यासाठी . Myths about periods in marathi.