Veg cutlet recipe in Marathi

व्हेज कटलेट कसा बनवावा मराठी

ingrediant

1/4 वाटी मैदा

1/4 लहान चमचा काळी मिरची

बटाटे चार किंवा पाच उकडलेले

गाजर एक किसलेला

शिमला मिरची एक बारीक चिरलेली

कोबी अर्धी वाटी बारीक चिरलेली

फ्लावर अर्धी वाटी बारीक चिरलेली

हिरवी मिरची एक किंवा दोन बारीक चिरलेले

आलं एक तुकडा

हिरवा कोथिंबीर बारीक चिरलेली

धने पावडर एक चमचा

लाल मिरची पावडर लहान चमचा

गरम मसाला लहान चमचा

आमचूर पावडर लहान चमचा

ब्रेड सहा

मीठ चवीनुसार

तेल तळण्यासाठी

veg noodle soup in marathi

veg cutlet recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा मैद्याच्या पिठाला पाण्यात मिक्स करून चांगले प्रकारे मळून घ्या. पातळ आणि चिकट कणीक बनवून घ्या .

त्या कणिकमध्ये काळी मिर्च आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यानंतर ब्रेडला मिक्सरला लावून बारीक चुरा बनवून घ्या .

गॅस चालू करून त्यावर एका कुकरमध्ये बटाटे घालून उकडून घ्या. बटाटे उकडल्यानंतर त्यांना थंड करून बारीक तोडून घ्या .

किसलेले गाजर , चिरलेली सिमला मिरची , बारीक चिरलेल्या कोबी फ्लावर आणि हिरवी मिरची घाला .

त्यानंतर आलं बारीक चिरून हिरव्या कोथिंबीर सोबत सगळ्या भाज्या आणि मसाले घालून ब्रेडचा चुरा सुद्धा मिक्स करा .

सगळे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. तुमचा वेज कटलेट बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे .

त्या मिश्रणाला बोटाच्या साह्याने थोडासा पीठ लावून हाताने दाबून घ्या. गोल आकार देऊन तुमचा कटलेट तयार आहे.

आता या कटलेटला मैद्याच्या पिठामध्ये घालून त्यासोबत ब्रेडचा चुरा चांगल्या प्रकारे लावून सगळे कटलेट अशाप्रकारे बनवून तयार करा आणि एका प्लेटमध्ये ठेवा .

गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवा . कढईमध्ये तेल घालून गरम करून घेणे.

गरम तेल झाल्यानंतर तीन ते चार कटलेट एक एक करून त्यात घालणे. चांगल्या प्रकारे ब्राऊन होईपर्यंत कटलेट तळून एका प्लेटमध्ये काढून घेणे .

तुमच्या स्वादनुसार व्हेज कटलेट तयार आहे . कोणत्याही भाजी सोबत किंवा चटणी सोबत व्हेज कटलेट खाऊ शकता.

veg cutlet recipe in Marathi and व्हेज कटलेट बनवण्याची पद्धत मराठीमध्ये. Mud therapy in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *