Anda fry recipe in Marathi
मसालेदार अंडा फ्राय कसा बनवावा
ingrediant
2__3 उकडलेले अंडे
1 कांदा
1 टोमॅटो
3/4 जीरा काळी मिर्च पावडर
पुदिना
अर्धा चमचा मिरची पावडर
2 चमचे तेल
मीठ स्वाद नुसार
1 चमचा आमचूर पावडर
anda fry recipe in Marathi
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा गॅस चालू करून त्यावर कुकर ठेवून घेणे.
कुकरमध्ये अंड्यांना उकडून घेणे . नंतर उकडलेल्या अंड्याला अर्धा कापून घेणे.
त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवून त्या पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाल्यानंतर कांदा , पुदिना आणि जीरा , काळी मिर्च पावडर घालून अंडा चांगले फ्राय करून घेणे .
अंडे फ्राय होतो तोपर्यंत टोमॅटो , कांदा थोडासा फ्राय करून त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेणे.
त्यानंतर पॅनमध्ये टोमॅटो पेस्ट , मिरची पावडर , आमचूर पावडर आणि मीठ घालून सगळे मिश्रण चांगले मिक्स करून घेणे.
फ्राय केलेले अंडे मसाल्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे हलवत राहणे . तोपर्यंत जोपर्यंत मसाल्याला तेल येत नाही .
अशाप्रकारे तुमचा मसालेदार अंडा फ्राय तयार आहे . त्याला चपाती नान किंवा भातासोबत खाऊ शकता.