Baby corn matar curry recipe in Marathi

Baby corn matar curry recipe in Marathi

Ingredients

250 gm बेबी कॉर्न

हिरव्या वाटाण्याची दाणे अर्धा कप

कांदा दोन

टोमॅटो दोन

हिरवी मिरची एक

आलं एक तुकडा

काजू आठ दहा

क्रीम अर्धी वाटी

तेल दोन चमचे

हिंग थोडीशी

जीरा अर्धा चमचा

धने पावडर अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

हळद पावडर अर्धा चमचा

लाल मिरची पावडर अर्धा चमचा

गरम मसाला अर्धा चमचा

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

dudhi chi bhaji.

baby corn matar curry recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा बेबी कॉर्न ला पाण्याने स्वच्छ धुऊन त्यानंतर त्याची देठ काढून लहान लहान तुकड्यांमध्ये चिरून घेणे.

नंतर वाटाण्याचे दाणे पण पाण्याने स्वच्छ धुऊन तयार करून घेणे . टोमॅटो आणि कांदा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून हिरवी मिरचीचा डेट काढून आलं सोलून स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे.

सार्व मिश्रण एका मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट बनवून घेणे .

क्रीम आणि काजू ला एका मिक्सरमध्ये वाटून पेस्ट बनवून घेणे. त्यानंतर गॅस चालू करून त्या गॅसवर एक पॅन ठेवून त्यात दोन लहान चमचे तेल घालून गरम करणे.

गरम तेलात वाटाण्याचे दाणे घालून आणि बारीक गॅसवर ठेवून हलवत राहणे. चांगले भाजून घेतल्यानंतर वाटाण्याचे दाणे एका प्लेटमध्ये काढून ठेवणे .

आता गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवणे . त्या कढईत दोन चमचे तेल घालून चिरलेली बेबी कॉर्न घालून दोन ते तीन मिनिटांसाठी हलवत चांगली भाजून घेणे .

त्यानंतर भाजून घेतलेली बेबी कॉर्न एका प्लेटमध्ये काढून ठेवणे . Kod var upay.

ग्रेव्हीसाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून त्यात हिंग आणि जिरा घालणे. जिरा भाजल्यानंतर हळदी पावडर घालून आणि पेस्ट बनवलेले कांदा टोमॅटो पण घालावे.

धने पावडर आणि लाल मिरची पण घालावी. मसाले चांगले हलवत भाजून घेणे. तोपर्यंत मसाले भाजत राहणे की जोपर्यंत तेल येत नाही . सुटत नाही.

आता मसाल्यामध्ये क्रीम आणि काजूची पेस्ट घालावी आणि मसाल्याला अजून थोड्यावेळासाठी भाजून घेणे .

त्यानंतर एक कप पाणी मिक्स करून त्यात मीठ , गरम मसाला भाजलेले वाटाण्या चे दाने आणि बेबी कॉर्न घालून मिक्स करणे .

भाजीला झाकून बारीक गॅसवर अजून पाच ते सहा मिनिटासाठी शिजवत ठेवणे . म्हणजे वाटाण्याची दाणे आणि बेबी कॉर्नर चांगले शिजतील.

भाजी शिजल्यानंतर एका वाटीमध्ये काढून त्याच्यावरून हिरवी कोथिंबीर घालून सजवणे .

गरमागरम बेबी कॉर्न मटर करी तुमची तयार आहे. चपाती किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता.

baby corn matar curry recipe in Marathi and बेबी कॉर्न मटार करी बनवायची पद्धत मराठीमध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *