Bharli karli recipe

Bharli karli recipe

भरली कारली कशी बनवायची

ingrediant

8___9 कारली

4__5 चमचे मोहरी चे तेल

जिरे अर्धा चमचा

हिंग चिमुटभर

खसखस एक चमचा

बडीशेप पावडर दोन चमचे

धने पावडर दोन चमचे

हळदी पावडर अर्धा चमचा

दही दोन चमचे

सुंठ पावडर अर्धा चमचा

गरम मसाला अर्धा चमचा

आमचूर पावडर एक चमचा

मीठ चवीनुसार

हिरवी मिरची एक दोन बारीक कापलेली

surmai dum biryani recipe

bharli karli recipe

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा आपण कारल्याला दोन्ही बाजूने देठ काढून चांगल्या प्रकारे धुन घेऊया‌ .

धुतलेल्या कारल्याला चाळणी मध्ये ठेवून आणि राहिलेले पाणी सुकवून घेणे .

कारल्याला अशाप्रकारे कापून घेणे की तो दुसर्‍या बाजूने जोडलेला असेल. म्हणजे कारले फक्त एका साईडहुन कापून घेणे.

त्यानंतर अर्धा चमचा मीठ घेऊन पूर्ण कारल्याच्या कापलेल्या भागांमध्ये थोडं थोडं मीठ लावून घेणे.

कोणत्याही भांड्यामध्ये इतके पाणी घ्या ज्यामध्ये कारले एकदम सोप्या ने पूर्णपणे भिजू शकतात .

त्यानंतर त्या कारल्यांना गरम करण्यासाठी ठेवणे. पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये कारले घालून घेणे.

झाकून बारीक गॅसवर कारली नरम होईपर्यंत उकळून घेणे. लक्ष असायला हवे की कारली एवढी पण नरम होऊ नये की कारले म्याश smash होऊ शकतात.

उकळलेली कारणे चाळणी मध्ये ठेवणे आणि पाणी काढून घेणे. कारण ते जेव्हा एकदम थंड होतील तेव्हा त्यांच्या आतला पाणी काढून घेणे .

कारल्याच्या आतले बीन्स चाकूच्या मदतीने काढून प्लेट मध्ये ठेवणे आणि बीन्स काढलेली कारले दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवणे.

आता आपण गॅस चालू करून गॅसवर एका कडई मध्ये दोन चमचे तेल घालून गरम करून घेणे .

गरम तेल मध्ये जिरं , खसखस आणि हिंग धने-जिरेपूड भाजून घ्या. आता अर्धा चमचा हळदी पावडर , बडीशेप पावडर आणि धणे पावडर घालने.

मसाल्यामध्ये कारले घालून चमच्याने हलवत राहणे . त्याला दोन मिनिट भाजून घेणे.‌

आता भाजलेल्या मसाल्यामध्ये दह्याचे पाणी सुकेपर्यंत मसाले दह्याला आपल्या आत ओढून घेईपर्यंत हलवत रहा.

नंतर गॅस बंद करणे . त्या मसाल्यामध्ये सुंठ पावडर, गरम मसाला, मीठ , आमचूर पावडर आणि कापलेली हिरवी मिरची घालून मिक्स करणे.

आता हे आपल्या कारल्या मध्ये भरण्यासाठी मसाला तयार आहे .

आता जेवढे कारले आहेत मसाल्याला तेवढ्या भागांमध्ये वाटून घेणे.

एक कारला उचलून आणि मसाला भरून एका प्लेटमध्ये ठेवून देणे. अशाप्रकारे सर्व कारले मसाल्यामध्ये भरून प्लेटमध्ये ठेवणे.

गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवून कढाई मध्ये तेल घालुन गरम करणे .

तेलात अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेणे. कारले भाजण्यासाठी तेलामध्ये घालून ठेवणे. मिडीयम गॅसवर कारली तीन ते चार मिनिटासाठी ठेवणे .

त्यानंतर कारली चारी बाजूने ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणे. बारा ते पंधरा मिनिटात कारले गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर गॅस बंद करणे आणि कारले तुमचे खाण्यासाठी तयार आहेत.

अशाप्रकारे भरलेली कारले एका प्लेटमध्ये काढून ठेवणे . चपाती पराठा किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता.

bharli karli recipe and भरली कारली कशी बनवायची मराठीमध्ये. How to look younger in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *