Surmai dum biryani recipe in Marathi
सुरमई दम बिर्याणी रेसिपी मराठीमध्ये
ingrediant
मॅरीनेट करण्याची सामग्री
मासे सहा ते आठ
मीठ चवीनुसार
काळी मिरची पावडर अर्धा चमचा
लिंबूचा रस एक लिंबू
पीसण्यासाठी सामग्री
हिरवी कोथिंबीर
पुदिना
हिरवी मिरची सहा
आले एक तुकडा
लसुन सहा सात पाकळ्या
मीठ चवीनुसार
पाणी एक वाटी
करीची सामग्री
तेल एक चमचा
एक कांदा कापलेला
एक टोमॅटो कापलेला
दालचिनी एक तुकडा
गरम मसाला अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
पाणी एक वाटी
बिर्याणी तांदूळ सामग्री
पाणी 12 कप
अर्धवट शिजलेले बासमती तांदूळ तीन वाटी
दालचिनी एक तुकडा
लवंग तीन
इलायची तीन
तमालपत्री
तळलेला कांदा गार्निश करण्यासाठी
paneer biryani recipe in Marathi.
surmai dum biryani recipe in Marathi
METHOD
बासमती तांदळाला चांगले धुऊन आणि एका तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवणे.
पाणी निथळून एका बाजूला ठेवून देणे.
त्याचवेळी माशाचे स्लाईस स्वच्छ पाण्याने धुऊन आणि कमीत कमी पंधरा मिनिटांसाठी मीठ काळी मिर्च आणि लिंबूचा रस घालून मॅरीनेट करण्यासाठी बाजूला ठेवणे .
तोपर्यंत मसाले बारीक करून घेणे. हिरवी कोथिंबीर, पुदिना , आलं लसूण पेस्ट बनवून घेणे. एका बाजूला ठेवणे.
त्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक पातेलं ठेवून त्यामध्ये 12 ते 15 कप पाणी घ्यावे.
पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ , मीठ , वेलदोडे , लवंग , दालचिनी तमालपत्रे घालून तांदूळ शिजवण्यासाठी ठेवणे .
जोपर्यंत तांदूळ शिजत आहे तोपर्यंत मासा चांगला फ्राय करून घेणे . सोनेरी रंगाचा मासा होईपर्यंत फ्राय करणे. जास्त शिजवू नये अर्धवट कच्चा असा ठेवणे .
त्यानंतर गॅसवर एक टोप ठेवून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत हलवत राहणे.
त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो बनवलेली पेस्ट घालून सगळे मसाले चांगले शिजवून घेणे .
मसाले शिजल्यानंतर त्यामध्ये ग्रील्ड केलेली माशाचे तुकडे आणि पाणी घालून माशाची करी शिजेपर्यंत गॅस बारीक करून ठेवणे .
मसाला तयार आहे . खाली माशाची करी एक लेयर त्याच्यावर शिजवलेल्या भाताची करी एक लेयर आणि त्याच्यावर फ्राय केलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर , पुदिना घालून गार्निश करून घेणे.
गॅसवर एक तवा ठेवून त्यावर ते टोप उचलून ठेवणे आणि पंधरा मिनिटांसाठी शिजवून घेणे.
अशा प्रकारे तुमची सुरमई दम बिर्याणी तयार आहे. Kod var upay.
अशा पद्धतीने सुरमई दम बिर्याणी कशी बनवावी आणि Surmai dum biryani recipe in Marathi.