Chole bhature recipe in Marathi

Chole bhature recipe in Marathi

छोले भटूरेे रेसिपी मराठी

Ingrediants

एक वाटी काबुली चणे

एक चमचा तूप

दोन चमचे लसून पेस्ट

एक तमालपत्री

तीन चार लवंगा

एक दालचिनी तुकडा

एक वाटी बारीक चिरलेला कांदा

एक टोमॅटो बारीक चिरलेला

अर्धा चमचा गरम मसाला

दीड चमचा लाल तिखट

अर्धा चमचा आमचूर

अर्धा चमचा धने पावडर

एक कप चहा चे पाणी रंग येण्यासाठी

मीठ चवीनुसार

काबुली चणे आठ-नऊ तास पाण्यात भिजत घाला

एक वाटी दही

एक वाटी मैदा

तळण्यासाठी तेल

read more – makhana kaju curry recipe in Marathi

chole bhature recipe in Marathi

Method

पहिल्यांदा आपण छोले बनवुन घेऊ

भिजवलेले छोले कुकरमध्ये थोडे मीठ घालून मऊसर शिजवून घ्या । जास्त शिट्ट्या केल्याने त्याने लगदा होतात । त्यामुळे अंदाज घेऊन शिट्ट्या करा ।

एकीकडे चहाचे पाणी करून घ्या । एका भांड्यात तूप गरम करा तुपात लवंगा दालचिनी तमालपत्र फोडणीला घाला ।

नंतर लसूण पेस्ट आणि कांदा घाला । खमंग वास सुटला की टोमॅटो , हळद , तिखट , गरम मसाला , आमचूर पूड आणि मीठ घालुन तेल सुटेपर्यंत परता।

उरलेले छोले घालून परता । चहाचे पाणी घाला । आवडीप्रमाणे पाणी घालून पातळ करा । थोडा वेळ उकळू द्या । गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून सजवा । गरम-गरम छोले तयार आहेत ।

दही आणि मीठ एकत्र करून घोटावे । त्यात मैदा घालून पीठ भिजवावे । दही आणि मीठ एकत्र केल्याने दह्याला किंचित पाणी सुटते त्यामुळे मैदा जास्त लागतो।

त्यात थोडेसे तेल घालावे। त्यानंतर पीठ मळून घ्या। पिठाला चार तास झाकून ठेवा म्हणजे पीठ चांगले मुरुन येईल ।

नंतर अजून एकदा पीठ मळून घ्याा । त्याचे छोटे गोळे बनवून घ्या । या गोळ्यांचे छोटे छोटे पुऱ्या बनवून घ्या ।

तेल गरम झाल्यानंतर पिठाच्या फुलक्या च्या आकाराच्या पुऱ्या तेलात टाकून तळून घेणे । तुमचे छोले-भटूरे तयार आहे ।

chole bhature recipe in Marathi and छोले भटूरे रेसिपी मराठी मध्ये सांगितली आहे. Hangover Treatment in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *