Makhana kaju curry recipe in Marathi
मखाना काजू करी रेसिपी मराठी
ingrediant
मखाने एक कप
25 काजू
तेल अर्धी वाटी ज्यामध्ये आपण काजू आणि मखाने तळू शकतो
ग्रेव्ही साठी
चार टोमॅटो
दोन हिरवी मिरची
25 काजू एक तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले
हिरवी कोथिंबीर अर्धी वाटी बारीक कापलेली
तेल दोन मोठे चमचे
आलं-लसणाची पेस्ट एक चमचा
कसूरी मेथी एक चमचा
हिंग एक छोटा चमचा
जीरा एक चमचा
गरम मसाला एक चमचा
हळद पावडर एक चमचा
लाल मिरची पावडर एक चमचा
धनिया पावडर एक चमचा
मीठ स्वादानुसार
read more – vangyache bharit recipe in Marathi.
Makhana kaju curry recipe in Marathi
Method
टोमॅटोला चांगलं धुऊन बारीक तुकड्यांमध्ये कापून घेणे. हिरवी मिरची ला चांगले धुऊन हिरवी मिरची आणि टोमॅटो मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेणे.
भिजवलेले काजू पण त्या बरोबर घालुन मिक्सर मध्ये पिसून घेणे . ग्रेव्हीसाठी मसाला भाजून घेणे.
पॅन गरम करणे आणि पॅनमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर जीरा घालने. जीरा भाजल्यानंतर हिंग घालून, लसणाची पेस्ट, हळद पावडर , धनिया पावडर , कसुरी मेथी घालून मसाला थोडासा भाजून घेणे .
आता पेस्ट बनवलेला मसाला घेऊन त्यामध्ये लाल मिरची पावडर पण घालने आणि मसाला बारीक गॅसवर जोपर्यंत त्याच्यावर तेल तरंगत नाही तोपर्यंत भाजणे.
जोपर्यंत मसाला भाजत आहे तोपर्यंत दुसर्या गॅसवर काजू आणि मखाने तळून तयार करून घेणे .
दुसऱ्या कढईमध्ये तेल घालून गरम करून मिडीयम गरम तेल मध्ये काजू घालून हलका ब्राऊन होण्यापर्यंत तळून घेणे .
नंतर थोडे थोडे मकाने घालून हलके ब्राऊन होण्यापर्यंत तळून घेणे. सगळे मखाने तळून तयार आहेत.
मसाल्याला मध्ये मध्ये हलवत भाजून तयार करणे . मसाल्यामध्ये तेल वेगळे होऊ लागल्यानंतर मसाला भाजून घेऊन मसाल्यामध्ये एक कप पाणी घालून मीठ गरम मसाला आणि थोडीसी हिरवी कोथबीर घालने.
ग्रेव्हीमध्ये उकळी आल्यानंतर भाजलेले मखाने आणि काजू घालून मिक्स करून घेणे. भाजीला झाकून तीन ते चार मिनिटासाठी बारीक गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणे.
म्हणजे काजू आणि मखान या च्या आत सगळे मसाले मिक्स होऊन जातील.
आता तुमची मखाना काजू करी भाजी तयार आहे . भाजीला एका वाटीमध्ये काढून त्यावर हिरवी कोथिंबीर ने सजवणे.
तुम्ही क्रीम घालून पण घेऊ शकता. मखाना काजू करी चपाती पराठा नान किंवा भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता.
makhana kaju curry recipe in Marathi and मखाना काजू करी रेसिपी मराठी मध्ये सांगितली आहे. Vang yene upay marathi.