kasturi kabab recipe in marathi
कस्तुरी कबाब रेसिपी मराठी
Ingrediants
चिकन ब्रेस्ट 2
आलं-लसणाची पेस्ट एक मोठा चमचा
एक लिंबूचा रस
पांढरी मिरची पावडर अर्धा चमचा
मीठ स्वादानुसार
लोणी एक मोठा चमचा
तेल दोन मोठे चमचे
शाही जीरा अर्धा चमचा
बेसन तीन मोठे चमचे
ब्रेड क्रम दोन मोठे चमचे
वेलदोडे पावडर चिमुटभर
केसर अर्धा ग्राम
ताजी क्रीम चार मोठे चमचे
हिरवी मिरची दोन
हिरवी कोथंबीर थोडीशी कापलेलिं
अंडे 2
चाट मसाला थोडासा
Read more – gajar halwa recipe in marathi.
kasturi kabab recipe in marathi
Method
चिकनचे पातळ असे स्लाईस करणे आणि एका बाउल मध्ये घालून त्यामध्ये आलं पेस्ट , लसूण पेस्ट लिंबूचा रस , व्हाईट पेपर पावडर आणि मीठ घालून चांगल्याप्रकारे मिक्स करणे .
दहा ते पंधरा मिनिटांसाठी मॅरीनेट होण्यासाठी ठेवणे. एक नॉन स्टिक कढई मध्ये लोणी आणि एक लहान चमचा तेल गरम करणे.
त्यामध्ये शहाजिरे घालून सुगंध येण्यापर्यंत भाजणे. नंतर बेसन घालून बारीक गॅसवर दोन किंवा तीन मिनिटासाठी अजून भाजणे .
नंतर मॅरीनेट केलेले चिकन चे स्लाईस , breadcrumbs , लहान वेलदोडे पावडर आणि केशर घालून मिसळणे .
मिश्रण ला एका बाऊलमध्ये घालून त्यावरून ताजी क्रीम घालून , हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक कापून चिकन मध्ये घालने आणि मिक्स करणे. आणखी पंधरा ते वीस मिनिट सेट होण्यासाठी ठेवणे .
अंड्याला फोडणे आणि त्यामधील पांढरा आणि पिवळा भाग वेगळा करणे . पांढर्याला चांगल्याप्रकारे फेटणे जोपर्यंत ते हलकं होत नाही .
चिकनचे स्लाइस Sticks ला लावून घेणे. उरलेले तेल एक नॉन स्टिक पॅन मध्ये गरम करणे आणि त्यामध्ये चिकन घालून समान सोनेरी रंग येईपर्यंत ग्रिल करणे .
त्यावर अंड्याचे फेटून घेतलेले पांढरे सर्वत्र लावून घेणे. दोन ते चार मिनिटासाठी शिजवणे.
कस्तुरी कबाब एका प्लेटमध्ये ठेवावे. त्यावर चाट मसाला पसरवून घ्यावा आणि गरमागरम खाणे .
kasturi kabab recipe in marathi and कस्तुरी कबाब रेसिपी मराठीमधे सांगितली आहे. Hiv chi lakshane marathi.