Palak mushroom recipe in Marathi

Palak mushroom recipe in Marathi

पालक मशरूम रेसिपी कशी बनवावी

ingrediant

पालक 350 gm

मशरूम 4-5

टोमॅटो 1

हिरवी मिरची

आलं एक तुकडा

ताजा हिरवा नारळ लहान तुकडे अर्धा वाटी

हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली

मीठ चवीनुसार

धने पावडर एक चमचा

गरम मसाला अर्धा चमचा

तेल दोन चमचे

हिंग चिमूटभर

जिरे अर्धा चमचा

लाल मिरची अर्धा चमचा

हळद पावडर अर्धा चमचा

क्रीम दोन चमचेे

sambar recipe in Marathi.

Palak mushroom recipe in Marathi

METHOD

पहिल्यांदा आपण पालक ची पाने तोडून त्याची देठ काढून साफ करून घेऊ. त्यानंतर त्या पानांना चांगल्या पाण्याने धुऊन घेणे .

चाळणी मध्ये ठेवून पाने सुके पर्यंत चाळणी बाजूला ठेवणे. पाणी सुकल्यानंतर पालक च्या पानांना बारीक कापून घेणे .

त्यानंतर मशरूम ला एका कापडाने साफ करून घेणे आणि मशरूमचे पातळ पातळ तुकडे कट करून घेणे . टोमॅटो , हिरवी मिरची, आलं आणि नारळाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवून घेणे .

आता आपण गॅस चालू करून त्यावर एक चमचा तेल घालून तेल गरम करून घेणे. तेल गरम झाल्यानंतर हिंग आणि जीरा घालून जिरा भाजल्यानंतर हळदी पावडर घालावी.

त्यानंतर आता बारीक केलेला मसाला, धने पावडर आणि लाल मिरची पावडर घालून मसाल्याला थोड्या थोड्या वेळाने हलवत राहा.

तोपर्यंत हलवणे की जोपर्यंत मसाल्यावर तेलाची तरी येत नाही .

आता मसाल्यामध्ये कापलेला पालक घालून मिक्स करणे. थोडसं पाणी घालने आणि दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण घालून मिडीयम गॅसवर शिजवायला ठेवा.

थोड्यावेळाने झाकण खोलून चमच्याने हलवणे आणि मशरूम चे तुकडे मीठ, गरम मसाला आणि हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा.

जर पाणी कमी असेल तर तुम्हाला हवे तेवढे पाणी घालने. जेवढी पातळ भाजी हवी असेल तेवढे पाणी घालून शिजवणे.

त्यानंतर भाजीला झाकून आणखीन पाच मिनिटांसाठी शिजवून घेणे . आता तुमची पालक मशरूमची भाजी तयार आहे.

हे भाजीला एका वाटीमध्ये काढून चपाती किंवा पराठा किंवा नान किंवा तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता.

palak mushroom recipe in Marathi and पालक मशरूम रेसिपी कशी बनवावे हे मराठी मध्ये सांगितले आह.

branded vs generic medicine marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *