Rosogolla recipe in Marathi

Rosogolla recipe in Marathi

ingrediant

दूध एक लिटर

साखर तीनशे ग्रॅम

लिंबू दोन

bakarwadi recipe.

rosogolla recipe in Marathi

METHOD

एका भांड्यात थोडंसं पाणी घालून स्वच्छ करून घेणेे. त्यानंतर दूध घालून गरम करण्यासाठी गॅसवर ठेवणेे.

दुधाला उकळी आल्यानंतर दूध गॅस वरून खाली उतरवून ठेवणे. त्यानंतर थोडं थंड करून घेणे.

दूध थंड झाल्यानंतर लिंबूचा रस मध्ये जेवढा रस आहे तेवढेच पाणी घालून मिक्स करणे .

दूध मध्ये थोडा थोडा एक एक चमचा करून लिंबूचा रस घालणे आणि मिक्स करणे.

दूध चांगल्या प्रकारे जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत लिंबूचा रस घालत राहणे आणि मिक्स करणे.

जसे दूध चांगल्या प्रकारे फाटेल त्यावेळी लिंबूचा रस घालणे बंद करणे आणि फाटलेल्या दुधाला एका सुती स्वच्छ कापडाने चाळून घेणे .

आता एका कापड्याला चाळणीच्या वर त्याच्याखाली एक भांड धरून फाटलेल्या दुधाला कपड्यावर घालणे.

नंतर फाटलेल्या दुधाचा निघालेले पाणी खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये येईल आणि फाटलेल्या दुधाचा जो चक्का आहे तो कापड्या राहील .

त्यानंतर राहिलेल्या चक्क्यावर एक किंवा दोन कप थंड पाणी घालणे.

चक्का थंड करून घेणे त्यामुळे चक्क्यावरचा लिंबूचा आंबट स्वाद पण संपून जाईल.

आता त्या कापडाला चारी बाजूने उचलून हाताने त्या चकत्याला दाबून चक्क्यातून राहिलेलं पाणी पिऴून काढणे. त्यानंतर तुमचा नरम चक्का तयार आहे .

चक्का ला एका प्लेटमध्ये काढून घेणे. नंतर हात आणि बोटाने त्याला दाबून आलटून पलटून चार ते पाच मिनिटांसाठी मळून नरम आणि चिकट करून घेणे .

नरम केलेल्या चक्क्याला दहा ते बारा भागांमध्ये वाटून घेणे .

नंतर एक भाग उचलून हाताच्या साह्याने लाडू सारखा दाबून गोल आकाराचा बनवून चिकट करून घेणे.

तयार गोळ्याला एका प्लेटमध्ये ठेवणे . सागळे गोळे अशा प्रकारे बनवून तयार करून घेणे .

नंतर गॅस चालू करून एका कुकरच्या भांड्यामध्ये रसगुल्ले शिजवून घेणे . त्यानंतर त्या कुकरमध्ये साखर चार कप आणि पाणी घालणे.

चांगली उकळी आल्यानंतर चक्क्याचे बनवलेले गोळे कुकरमध्ये एक एक करून घालावे आणि कुकर चे झाकण बंद करणे .

कुकरला एक शिट्टी येईपर्यंत गॅस मिडीयम ठेवणे आणि सात ते आठ मिनिटांसाठी शिजवून घेणे. नंतर गॅस बंद करणे .

त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन कुकरला थंड करून घेणे . कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून रसगुल्ला पाका बरोबर काढून घेणे .

रसगुल्ले थंड होण्यासाठी पाच ते सहा तास ठेवणे त्यामुळे ते चांगले गोड आणि स्वादिष्ट बनतील

अशाप्रकारे तुमचे स्पंज रसगुल्ले तयार आहेत. Mulvyadhiche prakar.

rosogolla recipe in Marathi and स्पंज रसगुल्ला कसा बनवावा हे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *