Samosa recipe in Marathi

Samosa recipe in Marathi

समोसा रेसिपी मराठीमध्ये

ingrediant

मैदा दोन वाटी

तूप अर्धी वाटी

बटाटे चार मिडीयम साईज मध्ये

हिरवे वाटाणे चे दाणे अर्धी वाटी

हिरवी मिरची दोन किंवा तीन बारीक कापलेली

आले एक तुकडा

धने पावडर एक चमचा

हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली

गरम मसाला अर्धा चमचा

आमचूर पावडर अर्धा चमचा

तळण्यासाठी तेल

मीठ चवीनुसार

Read more – veg Manchurian recipe marathi.

samosa recipe in Marathi

method

सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस वर बटाटे कुकर मध्ये घालून उकडून घेऊया. बटाटे उकडत आहेत तोपर्यंत मैद्या च्या पिठात तूप आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करणे.

कोमट पाण्याच्या सहाय्या ने थोडासा टाइट पीठ मळून घेणे. पिठाला सेट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवणे . समोसे यात भरण्यासाठी पिठी तयार आहे.

आता आपण बघू उकडलेल्या बटाट्याला सोलून आणि हाताने बारीक तोडुन घेऊया. पॅन गरम करून एक चमचा तेल घालून घेणे.

गरम तेलात आलं, हिरवी मिरची आणि हिरवा वाटाणा घालून मिक्स करणे. दोन मिनिटांसाठी शिजवून घेणे.

हिरवे वाटाणे थोडे नरम होतील. आता बारीक चिरलेले बटाटे घालूया. त्यानंतर मीठ , हिरवी मिरची , धने पावडर , हिरवी कोथिंबीर , गरम मसाला आणि आमचूर पावडर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे.

आता समोसे मध्ये भरण्यासाठी मिश्रण पण तयार आहे . Garbh nirodhak goli che nuksan.

आता मळलेल्या पिठापासून गोळे बनवून घ्या . एक गोळा घेऊन लाटण्याच्या सहाय्याने पुरी लाटून घ्या.

लाटलेली पुरी थोडी जाड असायला हवी. लाटलेल्या पुरीला दोन बरोबर भागांमध्ये चाकूच्या साह्याने कापून घेणे .

एक भाग त्रिकोण बनवणे. त्रिकोण बनवते वेळी दोन्ही भाग पाण्याने चिकटवून घेणे.

आता त्या त्रिकोणा मध्ये बटाट्याची भाजी भरून घ्यावी. पाण्याच्या साह्याने दोन्ही बाजूला चिकटवून घेणे.

आपल्या समोस्याचे आकार बरोबर आहेत का ते पाहणे. अशाप्रकारे सारे समोसे तयार आहेत.

समोसे तळण्यासाठी गॅस वर एका कढईमध्ये तेल घालून गरम करून घेणे . गरम तेलात चार किंवा पाच समोसे घालून ब्राऊन होईपर्यंत समोसे तळत राहणे .

गॅस मिडीयम फ्लेम मध्ये समोसे ला तळून घेणे . कढाई मधून समोसे काढून प्लेटवर ठेवलेल्या टिशू पेपर वर ठेवणे. सारे समोसे अशाच प्रकारे तळून घेणे . तुमचे समोसे तयार आहे.

अशाप्रकारे गरमागरम समोसे तयार आहेत. समोस्याला हिरवी चटणी बरोबर खाऊ शकता.

samosa recipe in Marathi and समोसा रेसिपी मराठीमध्ये सांगितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *