Sindhi kadhi recipe in Marathi

Sindhi kadhi recipe in Marathi

सिंधी कढी कशी बनवावी

ingrediant

एक वाटी मोठा गाजर स्लाईस केलेला

एक वाटी मोठा बटाटा सोललेला

शेवग्यांची शेंग चार तुकड्यांमध्ये कापलेली

अर्धी वाटी भेंडी चिरलेली

एक मोठा चमचा तेल

अर्धा चमचा मोहरी

अर्धा चमचा मेथीचे दाणे

चार कढीपत्ता

थोडीशी हिंग

एक चमचा बेसन

अर्धा चमचा हळद

एक चमचा मिरची पावडर

मीठ चवीनुसार

थोडीशी चिंच

अर्धा चमचा साखर

बारीक चिरलेली कोथिंबीर

read more – aloo kachori recipe in Marathi

sindhi kadhi recipe in Marathi

METHOD

गॅस चालू करून एका नॉनस्टिक कढईमध्ये दोन कप पाणी उकळण्यासाठी ठेवणे.

त्यामध्ये गाजर , बटाटा आणि शेवग्याची शेंग घालून बारीक गॅसवर दहा मिनिटांसाठी भाजी नरम होण्यासाठी शिजवत ठेवणे. शिजल्यानंतर एका बाजूला ठेवून देणे .

आता दुसऱ्या नॉनस्टिक कढाई मध्ये अर्धा चमचा तेल गरम करून त्यामध्ये भेंडी घालून बारीक गॅसवर भाजून घेणे. भाजल्यानंतर एका बाजूला ठेवणे .

नंतर त्याच नॉनस्टिक कढाई मध्ये राहिलेलं तेल घालून , त्यामध्ये मोहरी , मेथीचे दाणे , कढीपत्ता आणि हिंग घालून बारीक गॅसवर भाजून घेणे .

त्यानंतर त्यामध्ये बेसन घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे. बारीक गॅसवर हलक्या हाताने हलवत राहणे जोपर्यंत त्याला सोनेरी रंग येत नाही .

त्यानंतर त्यामध्ये हळद, अर्धा कप पाणी घालून घेणे. गाठी होऊ देऊ नये.

त्यानंतर त्यामध्ये शिजवलेली भाजी पाण्याबरोबर घालणे. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून मिश्रण थोड्या वेळासाठी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणे .

त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ , चिंचेचे पाणी , साखर घालून ते मिश्रण एकजीव करून घेणे आणि मधे मधे चांगलं हलवत राहणे .

त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आणि भेंडी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून बारीक गॅसवर ठेवून सारखं सारखं हलवत राहणे .

अशाप्रकारे तुमची सिंधी कढी तयार आहे गरम गरम खाण्यासाठी . Myths about period in marathi.

sindhi kadhi recipe in Marathi and सिंधी कढी कशी बनवायची ही मराठीमध्ये सांगितले आह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *