Vada pav recipe in marathi

Vada pav recipe in marathi

वडापाव रेसिपी मराठीमध्ये

ingrediants

सात-आठ बटाटे

दोन कप बेसन पीठ

एक चमचा तेल

एक चमचा जिरा

एक चमचा मोहरी

सात-आठ कढीपत्त्याची पाने

एक चमचा हळद

मीठ चवीनुसार

दोन चमचे धने

एक चमचा सोडा

पाच-सहा हिरव्या मिरच्या

दोन-तीन कांदे

एक चमचा आले लसूण टेस्ट

थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर

पाणी गरजेनुसार

read this recipe in hindi.

vada pav recipe in marathi

method

पहिल्यांदा बटाटे कुकर मध्ये घालून गॅस वर ठेवून उकडून घेणे. बटाटे उकडत आहेत तोपर्यंत.

एक स्टील चे भांडं घेऊन त्यामध्ये दोन कप बेसन पीठ, दिड कप पाणी, खाण्याचा सोडा एक चमचा , चवीनुसार मीठ आणि एक चमचा हळद घालून पिठाला चांगले तयार करून ठेवणे.

आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत वड्याची तयारी करून घेऊ.

सगळ्यात पहिले गॅस चालू करून त्यावर कढाई ठेवणे . कढाई मध्ये एक मोठा चमचा तेल गरम करावे.

एक चमचा तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरा , एक चमचा मोहरी , कडीपत्त्याचे सात ते आठ पाने , नंतर बारीक चिरलेला कांदा घालून चांगलं फ्राय करणे .

तुम्ही हिरवी मिरची बारीक करुन पण वापरू शकता किंवा पेस्ट पण वापरू शकता.

त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट , एक चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून चांगलं फ्राय करणे .

आता आपण उकडलेल्या बटाट्याची साल काढून घेऊ. त्यानंतर चांगल्या प्रकारे त्या बटाट्यांना smash करणे.

बटाटे चांगले कुस्करून झाल्यानंतर, बटाट्यांना त्या फोडणीमध्ये टाकावे . ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे.

पाच मिनिटे झाकण घालून शिजवत ठेवणे. चिरलेली कोथिंबीर भाजीच्या वर पसरवणे. आता आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे

तयार झालेल्या भाजीचे गोल गोल गोळे बनवून ठेवावे . त्या गोळ्यांना तयार केलेल्या बेसनाच्या पिठामध्ये भिजवून बेसनाच्या पिठाचा चांगला कोटिंग करावे .

पॅन मध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर वडे हळुवार सोडावे चांगले प्रकारे वडे फ्राय झाल्यानंतर टिश्यू पेपरवर काढून ठेवावे

चार ते पाच हिरव्या मिरच्यांना मध्ये चिरून मिरची फ्राय करून घेणे . वरून मीठ टाकावे.

बारीक चिरलेला कांदा , बारीक चिरलेली कोबी, बारीक चिरलेली काकडी या सगळ्यांना चिरलेल्या पावा मध्ये स्वास लावून त्यावर वाडा आणि त्यामध्ये बनवलेली कोशिंबीर घालावी.

अशाप्रकारे तुमचा वडापाव तयार झाला. वडापाव तळलेली मिरची बरोबर एकदम मस्त लागतो.

read more- anda curry recipe in marathi. 🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *